spot_img
spot_img

जिल्हा मागणीसाठी श्रीरामपूर कडकडीत बंद

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगरचे विभाजन झाल्यानंतर श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. श्रीरामपुरातील व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे आज सकाळपासूनच मार्केटमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.

गेल्या ४० वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा विषय प्रलंबित आहे. यासाठी अनेक आंदोलने, निवेदने, सह्यांची मोहीम आदी आंदोलने प्रभावीपणे राबविण्यात आली. परंतु, अद्यापही शासनाचे या मागणीकडे लक्ष गेले नाही. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. त्यास श्रीरामपूर येथील नागरिकांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी यास पाठिंबा दर्शवत बंद यशस्वी केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!