spot_img
spot_img

दुर्गापूर येथील प्रवरेच्या शाळेत बालगोपाळांची आषाढी वारीने हरीभजनाचा जयघोष

लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा):-महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये आषाढी वारी हे खरंतर महाराष्ट्राचं मोठं वैभव आहे आणि हेच वैभव जतन करण्याचं काम लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दुर्गापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी होत असल्याची माहिती प्राचार्या सौ.संध्या रोकडे यांनी दिली.

बालगोपाळाच्या आषाढी वारीची परंपरा ही महाराष्ट्राला हजारो वर्षाची लाभलेले आहे आणि हीच परंपरा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी या शाळेची भल्या सकाळी निघालेली आषाढी वारी सर्वांनाच विठ्ठल नामात तल्लीन करून गेली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालीनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिता विखे पाटील यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा जतन करण्याचं काम प्रवराच्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून होत होत आहे याच माध्यमातून दुर्गापूरच्या विद्यालयात आषाढी वारी उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दरवर्षी हा उपक्रम बाळगोपाळांसोबत साजरा केला जातो या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना होत असते या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेली विविध संतांची वेशभूषा रंगलेला हरिनामाचा जयघोष यामुळे संपूर्ण दुर्गापुर नगरी हरिनामांमध्ये तल्लीन होऊन विद्यार्थ्यांचा हरिनामाचा जयघोष. टाळ मृदुंगाचा जयघोष.. करत विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा या माध्यमातून सर्वच विद्यार्थी हरिनामांमध्ये तल्लीन झाले होते असे सौ.रोकडे यांनी सांगितले.

पायी दिंडीचा प्रवास,फुगडी आणि रिंगण सोहळा याचाही अनुभव विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी घेतला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मीनानाथ निर्मळ,कैलास वराडे सविता जाधव, गायत्री तांबे, दुर्गा तांबे , प्रमोद विखे, सकाहरी सोनवणे, मच्छिंद्र जरे यिंच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!