नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):- एका निमसरकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याची बदली झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. परंतु त्या अधिकाऱ्याने काही कर्मचाऱ्यांना घरगुती कामासाठी बोलविण्यात आलेले असून सरकारी कार्यालयातील बॉक्सचा वापर केला जात असल्याची कर्मचाऱ्यात चर्चा सुरु होती. याबाबत जनता आवाजने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर त्या निमसरकारी कार्यालयातील अधिकाऱ्याने कारवाईच्या भीतीने ते बॉक्स अडगळीला नेऊन टाकले आहेत.
नगर शहरातील एका निमशासकीय कार्यालयात एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना अपमास्पद वागणूक देऊन त्यांची मानहानी केलेली आहे. या अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारामुळे काहींचे मनोधैर्य खचले होते. त्या अधिकार्या विरोधात काही संघटनाही आक्रमक झालेल्या आहेत.
याबाबत काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे. त्यातच त्या अधिकार्याची बदली झाली आहे. त्यामुळे सर्वजण सुखावले आहे. या अधिकाऱ्याच्या बदलीची माहिती समजताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला असून काहींनी पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला.
संबंधित अधिकाऱ्याने आपला पदभार सोडला असला तरी कर्मचाऱ्यांना आपल्या दिमतीला ठेवत असल्याचा प्रकार काही कर्मचाऱ्यांनी उघड केला आहे.
या अधिकाऱ्यांने त्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना बोलवून घरातील सामान पॅकिंग करण्याच्या सूचना दिल्या असल्याची चर्चा कर्मचाऱ्या सुरू आहे. यासाठी निमसरकारी कार्यालयातील काही खोके वापरले जात असल्याची ही चर्चा सुरु होती.
याबाबत जनता आवाजने वृत्त प्रसिध्द होताच त्या कार्यालयात एकच खळबळ उडाली. कार्यालयातील माहिती कशी लिक झाली याचा शोध आता सर्वजण घेत आहे. कारवाई होईल या भीती पोटी ते बनवलेले बॉक्स त्या अधिकार्याने आपल्या दालनातून इतरत्र हलविले आहे. याबाबची सध्या त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यात जोरदार चर्चा सुरु आहे.