spot_img
spot_img

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात माता पालक मेळावा संपन्न

सात्रळ (जनता आवाज वृत्तसेवा):- श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु ll येथे आज चालू शैक्षणिक वर्षांमधील दुसऱ्या माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यार्थी माता पालक संघाच्या सौ सुवर्णा कडू यांनी भूषवले . सदर मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री.आबासाहेब पा घोलप आणि सर्व माता पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री बारगुजे यांनी चालू शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेमध्ये राबवावयाच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली.पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबर पालकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याबाबत जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला. यास 100% माता पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये शाळेच्या विविध उपक्रमात साथ देण्याचे मान्य केले. मोबाईल टीव्ही या बाबीवर जास्तीचा वेळ न देता त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीस अडथळा निर्माण होतो या साधनांचा अति वापराच्या दुष्परिणामांची जाणीव माता पालकांना करून दिली. या साधनांचा वापर करत असताना केवळ मनोरंजन म्हणून व्हायला हवा आपले विद्यार्थी जास्त वेळ यामध्ये गुंतून राहणार नाहीत याची सर्व मातांनी काळजी घेणे गरजेचे आहे विद्यार्थी विकासामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये मातांचे महत्त्व पटवून दिले. सौ नळे  यांनी सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी माता पालकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले .

सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेमध्ये विविध उपक्रम सातत्याने राबवण्याचे काम करत असून या सर्व उपक्रमास पालक वर्गाचा मोठा सहभाग असतो पालकांच्या सहभागाशिवाय शाळेचा कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही शाळेच्या विविध उपक्रमामध्ये शंभर टक्के माता पालक,, सहकार्यांमधून शाळेचे विविध उपक्रम यशस्वी होत असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. संजय कडू  तसेच माता पालक यांनी आपली मनोगत व्यक्त केली .विद्यार्थिनींनी ही आपली मनोगते व्यक्त केली.

विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका वाणी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. घोलप  यांनी तर आभार प्रदर्शन सौ .अंत्रे  यांनी केले .यावेळी मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे माता पालक, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. बारगुजे , उपप्राचार्या मा. वाणी  यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!