spot_img
spot_img

एचएसआरपी क्रमांक फलक नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):-  उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक नसलेल्या वाहनांवर १ जुलै २०२६ पासून विशेष तपासणी मोहीम राबवून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी बसविण्याची मुदत निश्चित करण्यात आली असून, यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून वेळ निश्चित केलेल्या वाहनांना त्या दिनांकापर्यंत कारवाईतून सूट राहणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली.

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार व केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० अन्वये १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार एचएसआरपी बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

१ जुलै २०२६ पासून एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० तसेच कलम १७७ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

ज्या वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून वेळ निश्चित केली आहे, अशा वाहनांना त्या दिनांकापर्यंत कारवाईतून सूट देण्यात येणार आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून त्वरित एचएसआरपी क्रमांक फलक बसवून घ्यावेत. १ जुलै २०२६ पासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी एचएसआरपी क्रमांक फलक बसवून शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही श्री.जोशी यांनी केले आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!