spot_img
spot_img

शिक्षणाबरोबरच खेळातून देखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठी संधी – डाॅ. सुष्मिता विखे पाटील  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धो

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष्य केंद्रित करावे व त्यामधून आपले भविष्य उज्ज्वल होऊ शक्यते. त्यामुळेच प्रवरेने शिक्षणा सोबतचं खेळाच्या उत्तम सुविधा निर्माण केलेल्या आहेत.या सुविधांचा फायदा विद्यार्थ्यांनी आपले करीअर घडविण्यासाठी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी केले आहे.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि शास्त्र संस्थेअंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी डॉ. सुष्मिता विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थेच्या संचालिका अॅड.रोहिणीताई निघुते, संचालक भाऊसाहेब जऱ्हाड,प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम प्राचार्य दिलीप महाले, डॉ.आशिष क्षीरसागर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, डॉ.चंद्रकला सोनवणे, डॉ.अभिजित नलावडे, डॉ. सुनील बुलाल , प्रा.सुनील निरगुडे प्रा.राम बोरसे, प्रा. सिताराम वरखड आदीसह विद्यापीठ संलग्न महाविद्यालया तील क्रिडा संचालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशिष क्षीरसागर यांनी केले. या स्पर्धा प्रवरेच्या विविध चार मैदानावर होणार असून त्यामध्ये २७ महाविद्यालयातील एकूण ३७८ खेळाडूंनी सहभाग घेतलेला असून याद्वारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या क्रिकेट संघाची निवड होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रमेश जाधव यांनी तर आभार प्रा. सत्येन खर्डे यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!