श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा): – श्रीरामपूर शहराची स्थापना तसेच शहराला श्रीरामपूर हे नाव देण्यामध्ये कै.रामचंद्र महाराज उपाध्ये यांचा सिंहाचा वाटा असून या शहराची प्रगती आणि जडणघडणीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.त्यांचा समाजसेवेचा वारसा उपाध्ये कुटुंब समर्थपणे पुढे चालवीत आहे. शहराची प्रगती होत असताना रामचंद्र महाराजांनी शहरात जातीय तेढ निर्माण होऊ न देता रामनवमी आणि सय्यद बाबा उरूस सुरु करून या माध्यमातून शहरांमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर निश्चितपणे आपलं शहर नावारूपाला येईल असे प्रतिपादन शहरातील मान्यवरांनी केले.
श्रीरामपूर शहराचे प्रथम नगराध्यक्ष कै.रामचंद्र महाराज उपाध्ये यांची ३७वी पुण्यतिथी राम मंदिर चौकात श्रीराम तरुण मंडळातर्फे साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कै.उपाध्ये यांच्या प्रतिमेस माजी आमदार भानुदास मुरकुटे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे,शिवसेनेचे नेते अशोक थोरे,माजी नगराध्यक्ष संजय फंड,ज्येष्ठ नेते आप्पासाहेब कदम, शिवसेना नेते संजय छल्लारे, भाजप नेते प्रकाश चित्ते, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,आदींनी यावेळी श्रद्धांजलीपर भाषणे केली.सर्वांनी कै.रामचंद्र महाराजांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
यावेळी उपाध्ये परिवाराच्यावतीने शहरातील शंभूक वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास सर्वश्री. संजय जोशी, राजेंद्र सोनवणे, रमण मुथा, आशिष धनवटे, महंता यादव, सुनील बोलके, रवी पाटील, दत्तू साबळे, मुख्तार शाह, नजीरभाई शेख, बुरहान जमादार ,मुन्ना पठाण, मर्चंट असोसिएशनचे संचालक मुन्ना झंवर, सुनील गुप्ता, प्रवीण गुलाटी, नंदू कोठारी, बाळासाहेब कासलीवाल, नितीन , योगेश ओझा, योगेश जाधव,सुनील दादा ससाने, पाशा शिवरकर, लकी सेठी, राधाकिसन बोरकर, कलीम कुरेशी, रियाज पठाण, रज्जाक पठाण, सुभाष नन्नवरे, गणेश मुद्गुले, साईनाथ गवारे, लखन भगत,सतीश सौदागर, विशाल अंभोरे,संजय पांडे,संजय यादव,अण्णासाहेब डावखर,अशोक दुगल, प्रवीण फरगडे, संदीप वाघमारे, दिलीप नागरे, पुरुषोत्तम मुळे, अशोक सोनी, रमेश गुंदेचा, रमेश लोढा, संजय शहा, रमेश वैद्य, कुणाल कांबळे, संजय साळवे, प्रदीप वाघ, सुधीर वायखिंडे, राजेंद्र उंडे, सोमनाथ चापानेरकर, सुरेश सोनवणे, दिनेश अंभोरे, राजू पाटणी, महेश उदावंत, गणेश भिसे, मनोज भिसे, सिद्धार्थ साळवे, संदीप शेडगे, कांतीलाल बोकडिया, अनिल चोरडिया, सिद्धांत छल्लारे, अनिल पांडे, बाळासाहेब आगे, करण नवले, सलीमखान पठाण, स्वामीराज कुलथे,महेश रकताटे , मधुकर माळवे,सचिन उघडे, विठ्ठल गोराणे, ताराचंद रणदिवे, श्रीधर कोलते, तानाजी कासार, के सी शेळके, ॲड अरुण लबडे, ॲड हेमंत थोरात, ॲड समीन बागवान,ॲड शफी शेख, महेंद्र पटारे, मयूर बोरसे, जितेंद्र छाजेड, राहुल कोठारी, संदेश नाबरिया, सिकंदर पठाण, अशोक उपाध्ये,कांतीलाल उपाध्ये,किशोर उपाध्ये, सोमनाथ उपाध्ये, आनंदराम उपाध्ये, भगवान उपाध्ये, गौतम उपाध्ये, जयराम उपाध्ये, बाळू उपाध्ये, विजय उपाध्ये, राहुल उपाध्ये, अतुल उपाध्ये,अविनाश उपाध्ये,विशाल उपाध्ये, सिद्धार्थ उपाध्ये,बाळू धुमाळ, प्रा.आदिनाथ जोशी, असलम शेख, दत्तात्रय कांबळे, मधुकर पवार, सुनील बंड, विराज आंबेकर, महेश व्यास,हनिफ पठाण, बाळासाहेब बागुल, संदीप मगर, विशाल गीते, महंता यादव, गुड्डू यादव, चंद्रकांत संगम, ब्रिजेश शहा, विजू डंबीर, मुन्ना परदेशी, राहुल मांडगे, भगवान क्षत्रिय, बाळू शिंगारे, अभिजीत भावसार, मनोज पोरवाल, मोहन हेलकुटे, दत्ता डोईजड, प्रवीण नवले, कैलास आढाव, अधिक जोशी, वैभव गायकवाड, महेश डावरे, सतीश गायकवाड, जपकर,अनिल लुल्ला, निलेश बोरावके,संदीप अग्रवाल,तेजस बोरावके,बाळासाहेब तोरणे, गुलाब झांजरी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सतीश म्हसे यांनी केले तर आभार राजेंद्र सोनवणे यांनी मानले.
उपाध्ये व्याख्यानमाला सुरू करू – मुख्याधिकारी
नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी देखील यावेळी उपस्थित राहून रामचंद्र महाराज उपाध्ये यांच्या नावाने नगरपालिकेतर्फे सुरू असणारी व्याख्यानमाला खंडित झाली असली तरी ती पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.



