spot_img
spot_img

वसतिगृहात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन बोधेगाव येथील ‌संस्था संचालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- बोधेगाव (ता. शेवगाव) येथील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी बोधेगाव येथील  हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. 6 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10 वाजता आरोपींपैकी कुशाबा नामक आरोपीला जेवणाचा डबा देण्याच्या कारणावरून तिला आपल्या खोलीत बोलावून घेतले. त्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद करून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेबाबत मुलीच्या कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर 8 ऑगस्ट रोजी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक आरोपीला विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या तीन  आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच एका आरोपीने हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हा 9 ऑगस्ट रोजी रात्री 11.58 वाजता दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. जखमी फिर्यादीवर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!