श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – पुणे येथील”काव्यमित्र संस्थेच्या” वतीने कवयित्री व लेखिका सौ.पल्लवी संजय आल्हाट यांना “राष्ट्रीय महिला समाज भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
काव्य मित्र संस्था पुणे,रौप्य महोत्सवी वर्ष तसेच राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर यांनी विविध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. पुरस्कार सोहळा तारांगण ऑडिटोरियम, सायन्स पार्क पिंपरी चिंचवड पुणे येथे पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळे ( अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या उपस्थितीत तसेच योगिता मस्के (माजी प्रकल्प अधिकारी यशदा ), सुशील दादा बियाणी (सेवाभावी उद्योजक पुणे),रणधीर पाटील(सेवाभावी उद्योजक बाणेर पुणे), प्रथमेश जंगम( उपाध्यक्ष नर्सरीमेन असोसिएशन महाराष्ट्र चॅप्टर) यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महिला समाज भूषण, व राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
श्रीरामपूर येथील आदर्श शिक्षिका, लेखनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या उत्कृष्ट लेखिका,प्राणी पक्षी मित्र तसेच प्रेरणा बहुउद्देशीय फाउंडेशनच्या अध्यक्ष, सौं पल्लवी आल्हाट यांचे शैक्षणिक सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत राष्ट्रीय महिला समाज भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
सदरचा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे.



