spot_img
spot_img

राष्ट्रवादी’च्या माजी आमदाराचा अपघातात मृत्यू राजकीय वर्तुळात शोककळा पसरली; त्यांच्या मृत्यूने राजकीय पक्षाला मोठा धक्का

मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीचा अपघात झाला यात त्यांचे निधन झाले आहे. माजी आमदार दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती.

या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर स्वरूपात जखमी झाले होते, त्यांना बिडकर यांचा अपघात अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी जवळ झाला होता. बिडकर त्यांच्यावर अकोलामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.

अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचे अपघातात निधन झाले. अकोलामधील शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळवर भेटले होते. बावनकुळे यांना भेटून बिडकर दुचाकीने घरी येत होते.

बिडकर यांची दुचाकी शिवर गावाजवळ आली असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू टेम्पोने धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तुकाराम बिरकड यांनी 2004 ते 2009 या काळात आमदारकी भुषवली होती. मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!