संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा ):-अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अनाधिकृत चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा टाकून १२०० किलो गोमांस व कत्तल करण्या साठी लागणारे साहित्य असा सुमारे ९ लाख २२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे .याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
संगमनेर शहरातील जमजन कॉलनी, तीळ गल्ली क्र.९, मध्ये अब्दुल समद कुरेशी त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबुन ठेवले असल्याची गुप्त माहिती खबर्यामार्फत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि दिनेश आहेर यांना समजली.त्यांनी लगेच पोलीस पथकाला पथकाला पाठवून देत कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो कॉ गणेश लोंढे, अशोक लिपणे, मनोज लातुरकर, विशाल तनपुरे यांनी जमजम कॉलनी येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी एका पत्र्या च्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे निदर्यतेने डांबुन ठेवलेले व 4-5 इसम हे गोवंश जनावरांची कत्तल करत असताना निदर्शनास आले. पोलीस पथकाला पाह ताच काही इसम हे पळून गेले.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत अब्दुलसमद जावेद कुरेशी, अदनान साऊद कुरेशी तबरेज याकुब कुरेशी रा. भारतनगर,मुनावर मेहबुब कुरेशी, रा. जम जम कॉलनी, गल्ली क्र.2, संगमनेर इतर दोन इसम असे फरार झालेल्या ६ जणांच्या विरोधात गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे यातील सलमान रशीद शेख रा जम जम कॉलनी यास पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने पकडला हा मुद्देमाल
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने १२०० किलो गोमांस, ६० हजार रुपये किमतीच्या तीन गोवंश जातीच्या कालवडी, २ हजार रुपये किमतीचा वजन काटा, ७००/- रू किं. लोखंडी कुऱ्हाड व सुरा व ५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण ९ लाख २२, हजार ७००/-रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
संगमनेर शहरात चालणारे बेकायदेशीर कत्तलखाने बंद करावेत अशी मागणी अमोल खताळ यांच्याकडे हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. त्यानुसार नगर पालिका आणि पोलीस प्रशासनाला कत्तलखाने पाडण्याबाबत आदेश दिले होती त्यानुसार नगरपालिका प्रशासनाने पाच कत्तलखाने जेसीबीच्या साह्याने पाडत जमीन दोस्त केले होते. तरीसुद्धा गोहत्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे.




Total Users : 624737