श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपुरातील अतिक्रमण हटाव मोहीमेचा मोर्चा आज वॉर्ड नं.२ मधील बेकायदा कत्तलखान्यांकडे नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात बेकायदा सात कत्तलखाने जमीनदोस्त केले. या ठिकाणी सुमारे 70 गोवशीय जनावरांची कातडे सापडले.
दोन दिवसांपासून पुन्हा श्रीरामपर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमेला वेग आला. आज वार्ड न.२ मध्ये असणाऱ्या ७ कत्तलखान्यावर ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी ७ बेकायदेशीर कत्तलखाने असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.
त्यानुसार आज गुरूवारी मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप याच्या मार्गदर्शनाखाली तसेच डिवायएसपी बसवराज शिवपुजे, पोनि.निरीक्षक नितीन देशमुख याच्या कडेकोट पोलीस बदोबस्तात नगर अभियता सूर्यकांत गवळी, अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, रावसाहब घायवट,अनंत शेळके, लक्ष्मण लबडे, प्रशांत जगधने, अमोल दाडगे, सुभाष शेळके, गौरव काळे, राम शेळके, सिद्धाथ साळवे, रामदास ढोकणे, अमन सय्यद, ढाकणे आदींनी या अतिक्रमण हटाव मोहीमेत कामगिरी केली.
वॉर्ड न.२ मध्ये असणाऱ्या काझीबाबा रोडवरील बेकायदेशिररित्या चालवले जात असलेल्या कत्तलखान्यावर आज पोलिसांच्या बदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने कारवाइे करण्यात आली या कतलखान्यांवर जेसीबी चालवू हे बेकायदेशिर कत्तलखाने जमीन दोस्त करण्यात आली या ठिकाणी 70 गोवंशीय जनावरांची कातडी तसेच काही मासाचे तुकडे जप्त करण्यात आले पालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये भरून हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले वार्ड नंबर दोन मध्ये सकाळी अतिक्रमण हटावचे पथक जेसीबी आणि पोलीस आल्यानंतर कोठे कारवाई होते हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सात बेकायदेशीर पणे चालणारे कत्तलखाने अतिक्रमण हटाव मोहीमेत जमीनदोस्त करण्यात आलयचे समजते
या प्रकरणात काझीबाबा रोड मक्का मस्जिद शेजारी अकरम कुरेशी याचे पत्र्याचे शेड मध्ये गौवशीय जनावरांचे कातडी व हत्यार सापडल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मोहीम सुरूच राहणार- मुख्याधिकारी घोलप
मध्यतरी अतिक्रमण हटाव मोहीम थडावल्याकडे तसेच इतर ठिकाणच्या अतिक्रमणाबाबत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप याच लक्ष वेधले असता घोलप यांनी श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम थाबणार नसून ती सुरूच राहणार आहे, असे स्पष्टपणे सांगितले. याबाबत लोकामध्ये सुरू असलेला संभ्रम आणि वेगवेगळया अफवांकडे लक्ष वेधले असता घोलप यांनी काहीही झाले तरी ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत केले.




Total Users : 624737