spot_img
spot_img

राहात्यातील अतिक्रमण धारकांवर प्रशासनाची कारवाई

राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):- येथील आंबेडकर चौक ते एकरूखे शिव असे राहाता ते चितळी रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्ही बाजूस शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग ,राहाता नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी सकाळ पासून काढण्यास सुरुवात केली असून बहुतांशी व्यवसाय तसेच रहिवाशनी नागरिकांनी प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने या अतिक्रमण मोहिमेत अनेकांची नुकसान टळली मात्र अपवाद वगळता ज्या नागरिकांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिरंगाई केली त्या अतिक्रमण धारकांवर प्रशासनाने हातोडा मारत कारवाई केली.

काही ठिकाणी प्रशासन व अतिक्रमणधरकांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. अतिक्रमण काढताना प्रशासनाने भेदभाव करू नये सरसकट रस्त्याच्या मध्यभागा पासून १२ मीटर अंतरावर असलेले अतिक्रमण काढावे असा सूर यावेळी अतिक्रमण काढलेल्या मालमत्ता धारकांकांनी बोलून दाखविला.

केंद्र व राज्य शासनाने शासकीय जागेवरील अनाधिकृत असलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील शासनाच्या आदेशाची कारवाई सुरू झाली त्या अनुषंगाने राहाता शहरात मागील १५ दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोपरगाव नाका पश्चिम बाजूस असलेले अतिक्रमण प्रशासन निर्णय काढून रस्ता मोकळा केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चितळी गावापर्यंत रस्त्याच्या मध्यभागा पासून दोन्ही बाजूस असलेले अनाधिकृत अतिक्रमण काढून टाकण्यासाठी प्रशासनाने २७ फेब्रुवारी या तारखेपर्यंत काढून टाकण्यासाठी अल्टिमेट दिला होता.

तसेच अतिक्रमण न काढणाऱ्या मालमत्ता धारकांवर अतिक्रमण काढण्याचा खर्च टाकला जाईल तसेच पुन्हा शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे लेखी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रम धारकांना बजावल्यामुळे तसेच श्रीरामपूर, कोपरगाव व अन्य तालुक्यात अतिक्रमण धारकांवर केली जाणारी कारवाईचा धसका शहरातील आक्रमक धारकांनी घेत नुकसान नको म्हणून बहुतांशी अतिक्रमण धारकांनी स्वतःहून चार-पाच दिवसापूर्वीच अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली होती.

त्यामुळे गुरुवारी सकाळी प्रशासनाला काही ठिकाणी अपवाद वगळता अतिक्रमण काढण्यास कुठलेही प्रकारचा त्रास झाला नाही. अतिक्रमण काढत असताना प्रशासन व काही अतिक्रमण धाररकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची दिसून आली. ही अतिक्रमण मोहीम सातत्याने सुरूच राहणार असून शासकीय जागेवर कुठल्याही स्वरूपाचे अतिक्रमण नागरिकांनी करू नये व त्या ठिकाणी अतिक्रमण केल्यास संबंधित अतिक्रमण धारकांवर कायदेशीर कारवाई तात्काळ केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. चितळी रोड लगत दोन्ही बाजूस व्यवसायिकांनी दुकानासमोर पत्त्याच शेड उभे केले असल्याने या ठिकाणी सातत्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता.

गुरुवारी या परिसरातील अतिक्रमण मुक्त झाल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला अशी चर्चा शहरात नागरिकांकडून केली जात होती. राहाता शहरात अतिक्रमण काढताना प्रशासनाने सरसकट नियमाप्रमाणे सर्वच अतिक्रमण काढावे अतिक्रमण मोहीम राबवतांनी भेदभाव करू नये अजून काही ठिकाणी व्यवसाय तसेच रहिवाशांनी शासकीय जाहीर वरील असलेले अतिक्रमण काही प्रमाणात काढले नाही त्यांच्यावर देखील प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ अशी प्रतिक्रिया गुरुवारी या मोहिमेत अतिक्रमण काढलेल्या मालमत्ताधारकांनी बोलून दाखवली

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!