spot_img
spot_img

शिर्डीत पोलिसांनी कमिशन एजंटवर कारवाई १९ कमिशन एजंट, ४ अवैध प्रवासी वाहतूक गाड्या, व दारू अड्ड्यांवर छापा

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ) :-  शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून पोलिसांनी १९ कमिशन एजंट, अवैध प्रवासी वाहतूक करणारे ४ जण आणि दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून एकूण ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गाडी आणि दारूचा समावेश आहे.

गुरुवारी पकडण्यात आलेल्या १९ कमिशन एजंटना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १२०० रुपये दंड किंवा सहा दिवसांची कैद अशी शिक्षा सुनावली. मात्र, सर्व कमिशन एजंटनी दंड भरून आपली सुटका करून घेतली.

यापुढे जर कोणताही कमिशन एजंट पकडला गेला, तर तो ज्या फुल हार प्रसाद दुकानावर काम करत असेल, त्या दुकानदारालाही आरोपी करण्यात येईल, असा सक्त इशारा पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिला आहे.

पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख व पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याची मोहीम घेतल्याने त्यांनी सुरू केलेल्या या कारवाई मोहिमेचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरू ठेवली तर शिर्डीतील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!