श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईदुल-फित्र अर्थात रमजान ईद काल शहर व परिसरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ईदगाह मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज आदा केली.
यावेळी मुफ्ती मोहम्मद रिझवानुल हसन यांचे अत्यंत ओजस्वी असे हिंदू मुस्लिम ऐक्य अभिप्रेत करणारे प्रवचन झाले. ईद निमित्ताने उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांना संबोधित करताना ते म्हणाले की हा देश सर्वांचा आहे आणि हा देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी देखील सर्वांची आहे एका घराला आग लागली तर इतर घरे सुद्धा त्यामध्ये खाक होऊ शकतात याची जाणीव प्रत्येकाने ठेवायची गरज आहे. वक्फ बिलाबाबत होणाऱ्या टीका टिपणी बाबतही त्यांनी भाष्य केले कोणा एकाची नसते ती सर्व समाजाची असते त्यामुळे सरकारने त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये असे आवाहन केले. शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली यांनी ईदच्या नमाजची इमामत केली.
जामा मशीद इथेही ईदची नमाज अदा करण्यात आली. जामा मशिदीचे खतीब व इमाम हजरत मौलाना मोहम्मद ईमदादअली यांनी यावेळी प्रवचन दिले.मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी इमामत केली.
याशिवाय शहरातील इतर मशिदीतूनही ईदची नमाज अदा करण्यात आली.
जामा मशीद व ईदगाह मध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले युवा नेते करण दादा ससाने सचिन गुजर सिद्धार्थ मुरकुटे माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक अशोक कानडे,अशोक उपाध्ये संजय छल्लारे,नीरज मुरकुटे, लकी सेठी निलेश भालेराव,महेंद्र त्रिभुवन, अरुण मंडलिक,तिलक डुंगरवाल,सत्यनाथ शेळके यांच्यासह डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,पत्रकार प्रदीप आहेर,ज्ञानेश गवले,अमोल कदम यांचेसह सर्व खात्याचे अधिकारी कर्मचारी व सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईदच्या नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. इदगाह कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर शेख व इतर सदस्यांनी सर्वांचे स्वागत केले. ईदच्या नमाज नंतर सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींनी मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन शिरखुर्माचा आस्वाद घेतला. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.




Total Users : 636581