spot_img
spot_img

कोल्हारला तीन वाहनांचा विचित्र अपघात ! कोल्हार- घोटी मार्गावरील काळया मळ्याजवळ घटना; दुधाचा टँकर, वॅगनार व एक्सयूव्हीचे मोठे नुकसान

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा) :- कोल्हार-घोटी रस्त्यावरील काळा मळा (खर्डे वस्ती) परिसरात दुपारी एकच्या सुमारास दुधाचा टँकर, वॅगनार आणि एक्सयूव्ही-३एक्सओ या तीन वाहनांचा अपघात झाला. अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वॅगनारमधील सात प्रवाशांसह १८ महिन्यांचे बाळही सुखरूप बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

माहितीनुसार, मढी येथून दर्शन घेऊन संगमनेरकडे निघालेली वॅगनार (एमएच-०२-पीए-९९७८) आणि संगमनेरहून दूध घेऊन राहुरीकडे जाणारा दुधाचा टँकर (एमएच-१७-एजी-८१५८) यांची समोरासमोर धडक झाली. धडकेचा जोर इतका होता की, वॅगनार मागून येणाऱ्या एक्सयूव्ही-३एक्सओ (२४ बीएच-७३७६), जी लोणीमार्गे राहुरीकडे जात होती, तिच्यावर जाऊन आदळली.

अपघातानंतर टँकरचा ताबा सुटून  रस्त्यापासून सुमारे १५० मीटर दूर जाऊन रोडलगत खर्डे वस्तीतील एका घराच्या तटबंदीवर धडकली. या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

वॅगनारमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते त्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश होता. एक्स यु व्ही मध्ये परिवारासह १८ महिन्याच्या एका बालकाचा समावेश होता.

अपघाताचे स्वरूप गंभीर असतानाही सर्व प्रवासी सुरक्षित बचावले. काहींना किरकोळ मार लागला असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिस ठाण्याचे शिवाजी नऱ्हे आणि पोपट भोईटे  यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वॅगनार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यामुळे काही काळ विस्कळित झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

या अपघातामुळे कोल्हार-घोटी मार्गावरील भरधाव वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!