नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा): – नागापूर (ता.नेवासा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेना – भाजपा’ने या सहकारी संस्थेवर पहीला विजयाचा झेंडा रोवला आहे त्यामुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून नवनियुक्त चेअरमन – व्हाईस चेअरमनसह संचालक मंडळाचे कौतुक केले जात आहे.
नागापूर (ता.नेवासा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजप – सेना प्रणित हा पॅनल बिनविरोध निवडून आला माञ विरोधी गटाला पॅनलही या निवडणूकीत उभा करता आलेला नाही अॅड.विश्वासराव काळे व अॅड.संभाजी काळे यांनी या पॅनलचे नेत्तृत्व केले या झालेल्या निवडणूकीत सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक काळे तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश लवांडे यांची निवड करण्यात आली तर नवनिर्वाचित संचालक मंडळात अॅड.विश्वासराव काळे,आयुष काळे,नितीन काळे, विलास काळे,भाऊसाहेब कापसे,सुदाम काळे,लक्ष्मण गोरे,सौ.रत्नमाला काळे,सौ.संगिता काळे,सौ.हिरा नवथर आदींचा समावेश आहे
नवनिर्वाचित संचालक मंडळाचा आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी सत्कार केला असून प्रथमच झालेल्या या सोसायटी निवडणूकीत भाजप – शिवसेनेने आपला पहीला झेंडा आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली रोवला असल्यामुळे शिवसेना – भाजप महायुतीकडून नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले आहे.



