श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-दि. 02 रोजी रात्री 12/00 वा. सुमारास चाकण पोलीस स्टेशन ता. खेड जि. पुणे हद्दितुन MH-14 LX-0315 या नबंरची अशोक लेलडं दोस्त एक्स. एल. माल वाहतुक गाडी चोरी झाली असुन सदरची गाडी हि श्रीरामपूर येथे येण्याची शक्यता असल्याची माहिती चाकण पोलीस स्टेशन कडुन प्राप्त झाल्याने पोनि. नितीन देशमुख साो. यांनी तपास पथकास सदर गाडीचा शोध घेण्याचे तोंडी आदेश दिल्याने तपास पथकाने सदर गाडीचा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दित शोध घेवुन सदर चोरीची गाडी बेलापूर रोड, दत्तभवन जवळ, वॉर्ड नं.03 श्रीरामपूर येथे सराईत आरोपी नामे समीर नासिर पठाण, (वय 40 वर्षे), रा. खंडाळा ता. वैजापूर जि.छ. संभाजीनगर यांच्या ताब्यात मिळुन आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्याकडुन खालील वर्णनाची गाडी जप्त करण्यात आली.
7,00,000/- रु.किं.ची. अशोक लेलडं दोस्त एक्स. एल. माल वाहतुक तिचा नंबर MH-14 LX-0315 असा असलेली जुवाकिंअं.सदरची गाडी चोरी झालेपासुन चौवीस तासाच्या आत आरोपीसह जप्त करण्यात आली व जप्त गाडी व आरोपी चाकण पोलीस स्टेशन ता. खेड जि. पुणे पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोना/शरद अहिरे, पोकॉ/अमोल पडोळे, पोकों/संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/अजित पटारे, पोकॉ/अमोल गायकवाड, पोकॉ/आजिनाथ आंधळे, पोकॉ/सागर बनसोडे, पोकॉ/ रामेश्वर तारडे, मपोकॉ/ मिरा सरग यांनी केली आहे.



