spot_img
spot_img

कोल्हार येथील रांका परिवारातर्फे स्तुत्य उपक्रम

कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथे मागील वर्षी नगर मनमाड महामार्गलगत भगवती माता देवालय ट्रस्टच्या वतीने नव्यानेच बांधल्या गेलेल्या सुंदर व भव्य अश्या स्वागत कमानीवर “श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्ट -सुस्वागतम ” हा अतिशय आकर्षक एलईडी बोर्ड कोल्हार येथील प्रसिद्ध उद्योजक अतुल कांतीलाल रांका यांनी आपल्या मुलीच्याच्या वाढदिवसा प्रित्यर्थ देऊन स्वागत कमानीच्या वैभवात खऱ्या अर्थाने भर घालत आई भगवती  मातेच्या चरणी आपली व आपल्या परिवाराची कृतज्ञता व्यक्त करत सेवा रुजू केली.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आई भगवती मातेच्या यात्रा उत्सव काळात या भव्य अश्या स्वागत कमानी वरील हा आकर्षक एलईडी बोर्ड विशेष करून रात्रीच्या वेळी सर्व भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत होता.

अतुल रांका यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त हारतुरे व हॉटेल पार्टीला फाटा देत कोल्हार गावच्या वैभवात भर घालणाऱ्या स्वागत कमानीवर आकर्षक असा एलईडी बोर्ड बसवत अनोख्या पद्धतीने सेवा कार्य करुन समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे पा. तसेच कोल्हार बुद्रुकचे मा.सरपंच सुरेंद्र खर्डे पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!