spot_img
spot_img

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला दुसऱ्यांदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रशासन केंद्र असलेल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला दुसऱ्यांदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या अधिकृत मेलवर हा धमकीचा संदेश आला आहे.

प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली असून, ‘बॉम्ब शोधक व नाशक’ पथकाकडून  परिसराची कसून तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. या वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. अशा प्रकारच्या धमक्या येणे हे योग्य नसल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. यावर प्रशासनाने कठोर अशी भूमिका घेतली पाहिजे की, जेणेकरून अशा प्रकारचे धाडस करण्याची कुणाची हिंमत होणार नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!