spot_img
spot_img

अधिकाऱ्याच्या दिमतीला संघटनेचा पदाधिकारी

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याच्या दिमतीला शिक्षक संघटनेतील पदाधिकारी कायमस्वरूपी राहत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खमंग चर्चा रंगली आहे. सदर पदाधिकारी हा केवळ संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मर्यादित न राहता, अधिकाऱ्याच्या दैनंदिन कामकाजात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे दिसून येत आहे. अधिकारी जिकडे तिकडे जात असताना हा पदाधिकारी कायम त्यांच्यासोबत असतो. विशेष म्हणजे, तो पदाधिकारी आपल्या चारचाकी वाहनातून संबंधित अधिकाऱ्याची ने-आण करीत असल्याने शिक्षकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या पदाधिकाऱ्याच्या सततच्या उपस्थितीमुळे शिक्षण विभागातील निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची भावना शिक्षक वर्गात आहे. संघटनेतील नेते व कार्यकर्त्यांची अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी या पदाधिकाऱ्याचा प्रभाव वापरला जात असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे सामान्य शिक्षकांना मात्र आपली कामे करून घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

 

सविस्तर वृत्तवाचा दैनिक जनता आवाजमध्ये पहा

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!