spot_img
spot_img

प्रेमसंबंधाचा वाद जीवावर  रामवाडीत तरुणाची निर्घृण हत्या, चार आरोपी अटकेत

कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा):-शहरातील रामवाडी परिसरात रविवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या हत्येच्या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे. हनुमान मंदिरासमोर नवनाथ माधव कानफाटे (वय ३३) या तरुणाचा दगड, वीट व लोखंडी कत्तीने अमानुष मारहाण करून खून करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी मयताचा भाऊ समाधान माधव कानफाटे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, नवनाथ याचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आरोपींकडून त्याला यापूर्वीही धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे.

रविवारी रात्री नवनाथ याला आरोपींनी फोन करून रामवाडी येथील हनुमान मंदिरासमोर बोलावले. “तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस?” या कारणावरून मनात राग धरून आधीच कट रचत आरोपींनी लोखंडी कत्ती, वीट व दगडांनी नवनाथच्या डोक्यावर जबर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला.

या प्रकरणी करण सुदाम मोरे, संजय सुदाम मोरे, समाधान कचरू पोटे (सर्व रा. रामवाडी) व रोहित दयानंद पवार (रा. वारी) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ६२ (२), ३५१ (३), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती तसेच कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. वेगवान तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत चारही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.

या घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!