राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):- जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीरांनी दिलेला जगा आणि जगू द्या हा संदेश कृतीत आणावा भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसा सत्य आणि करुणा या तत्वांचा जीवनात प्रत्येक व्यक्तीने अंगीकार करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन राहाता नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांनी केले आहे .
भगवान महावीर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक प्रवीण सदाफळ, दशरथ तुपे, ॲड.मयूर पाळंदे, शशिकांत लोळगे, नितीन गाडेकर, प्रभाकर आरणे, सुयोग शेळके, अरुण गाडेकर, रमणलालजी रुणवाल,गोटूशेठ राईसोनी, उद्योजक प्रफुलजी पिपाडा, उद्योजक राजेशजी भन्साळी, पारसजी धाडीवाल, प्रवीणजी डुंगरवाल, नंदलालजी डुंगरवाल, महावीरजी पिपाडा, मनोजजी पिपाडा, गोपी पिपाडा, चेतन रुणवाल,अभय रुणवाल, कमलेश रुणवाल, अजीत धाड़ीवाल ,सचिन अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की जगभरातील मानवासाठी भगवान महावीर शांती अहिंसा व प्रेमाचे प्रतीक आहेत त्यांनी दिलेला जगा आणि जगू द्या हा संदेश प्रत्येकाने जीवनात अंगीकारणे खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर सत्य अहिंसा व करुणा प्रत्येकाने आपल्या अंगी बाळगणे गरजेचे आहे भगवान महावीरांनी दिलेली शिकवणूक संदेश व तत्वांची खऱ्या अर्थाने आज जगाला गरज आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीच मतदार संघात सामाजिक एकोपा व सलोखा जपलेला आहे त्याचे उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आपणा सर्वांना अनुभवायला मिळाले जैन समाजातील व्यावसायिक प्रवीण रुणवाल यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करून या मतदार संघात सर्वांना समान संधी दिली जाते जाती धर्माच्या पलीकडे एकोपा जपला जात असल्याचा संदेश राज्याचे जलसंपदा मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी दिला आहे.
जैन बांधवांनी राहाता नगरपरिषदेकडे नवीन जैन स्थानक उभारणी संदर्भात प्रस्ताव दिल्यास तो प्रस्ताव राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडून मंजूर करून घेत त्यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्हे असे भव्य दिव्य जैन स्थानक राहाता शहरात उभारून हा प्रश्न तातडीने मार्गी लावू अशी ग्वाही राहाता नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी भगवान महावीर जयंती दिनी जैन समाज बांधवांना दिली आहे



