spot_img
spot_img

अक्षय कर्डिले बांधावर; सरसकट पंचनाम्याच्या सूचना स्व. शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा जोपासत शेतकऱ्यांना दिला धीर

राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा) :- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव, गडकवाडी पंचक्रोशीतील गावांमध्ये अवकाळी पावसाने रुद्ररूप धारण करत वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. कांदा, गहू, मका, ऊस तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. शेतकऱ्यांची व्यथा ऐकत त्यांनी त्यांना धीर दिला.

अक्षय कर्डिले यांनी शेतातूनच तहसीलदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने तत्काळ मदतीचा हात द्यावा, असे ते म्हणाले.

स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा जोपासत अक्षय कर्डिले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यात सर्वत्र नुकसान; पालकमंत्र्यांना दिली माहिती जिल्ह्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आल्याची माहिती अक्षय कर्डिले यांनी दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे तसेच आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!