spot_img
spot_img

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला.

पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE result) राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राज्याचा एकूण निकाल: ८९.७९%

मुलींचा निकाल: ९३.१५ %

मुलांचा निकाल: ८६.८० %

सर्वात जास्त निकाल असलेला विभाग : कोकण

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखला. मुंबई आणि पुणे विभागाचा निकालही चुरशीचा लागला आहे. Maharashtra HSC result 2026 pass percentage details

विभाग निहाय  निकाल

पुणे ९१.२५

नागपूर ८८.६७

छत्रपती संभाजीनगर ८८६८

कोल्हापूर ८९.९७

अमरावती ९०.९२

नाशिक ९०..७२

लातूर ८४.१४

कोकण ९४.१४

मुंबई ९०.०८

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!