spot_img
spot_img

अक्षय कर्डीलेंना विजयी प्रमाणपत्र प्रदान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. संग्राम जगताप यांची हजेरी

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष तथा महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी दमदार विजय मिळवत राजकीय वर्तुळात आपली छाप पाडली. मतमोजणीनंतर अधिकृत निकाल जाहीर होताच निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या हस्ते अक्षय कर्डीले यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विजयानंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व एकमेकांना पेढे वाटत आनंद साजरा केला.

नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डीले यांनी मतदारांचे आभार मानत राहुरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. हा विजय जनतेचा आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचा वेग वाढवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हा विजय महायुतीच्या कामगिरीवरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. आगामी काळात मतदारसंघात अधिक वेगाने विकासकामे राबवली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!