spot_img
spot_img

श्रीरामपूरात तरुण-तरुणीची रेल्वेखाली आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून तपास सुरू

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :- तालुक्यातील बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. रेल्वे रुळांवर एका तरुण व एका तरुणीचे छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही माहिती रेल्वे प्रशासनाने तत्काळ श्रीरामपूर शहर पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत दोघांचाही मृत्यू रेल्वेच्या धडकेत झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी साखर कामगार रुग्णालयात हलविले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल औताडे करत आहेत.

दरम्यान, मृत तरुण हा भैरवनाथनगर परिसरातील सुदेश नावाचा असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृत मुलगी अल्पवयीन असून ती घरकुल परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.

घटनास्थळी एमएच १२ डीके १७६७ क्रमांकाची दुचाकी आढळून आली असून ती या घटनेशी संबंधित असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

प्रेमसंबंधातून दोघांनी टोकाचे पाऊल उचलले का, की या मागे इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीरामपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!