spot_img
spot_img

सात्रळ येथे व्यापार्‍याला अडवून मारहाण करत जबरदस्तीने रोख रक्कम उकळल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला केले जेरबंद

राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे व्यापार्‍याला अडवून मारहाण करत जबरदस्तीने रोख रक्कम उकळल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला जेरबंद केले आहे. प्रशांत उर्फ चाचा रावसाहेब पलघडमल (वय ३२, रा. सात्रळ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार १८ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवत फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने २५ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. दरम्यान, आरोपी प्रशांत पलघडमल हा निमगाव खुर्द (ता. संगमनेर) येथील अमरधाम परिसरात थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कामगिरी बजावली. पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!