spot_img
spot_img

भाजपचे विधानपरिषदेच्या ११ उमेदवारांची घोषणा अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी

 मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. कोणता पक्ष किती जागा लढवणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. आता अखेर महायुतीचा तिढा सुटला असून विधानपरिषदेच्या १७ जागांपैकी ११ उमेदवारांची घोषणा भाजपाने केली.

जाहीर झालेले उमेदवारांचे नावे 

अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे

भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर

अमरावती : प्रविण पोटे पाटील

सांगली-सातारा : धैर्यशील कदम

सोलापूर : राजेंद्र राऊत

नांदेड : अमर राजूरकर

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखानी

धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील

नागपूर : डॉ.राजीव पोतदार

जळगाव : नंदकिशोर महाजन

छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. यानंतर अखेर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. विधानपरिषदेच्या १७ जागांपैकी भाजपा ११ जागा लढवणार, तर शिवसेना शिंदे ४ जागा लढवणार आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष २ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज अर्ज दाखल करायचा शेवट दिवस असून कोण अर्ज भरणार व कोण बंडखोरी करणार . यावर काहींचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!