कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार येथील डॉ. गौरव पांडुरंग खर्डे व डॉ. रेणुका गौरव खर्डे यांच्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नित्यसेवा हॉस्पिटल अँड चाईल्ड केअर या रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी संपन्न झाले.
यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलाने उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावात आणि परिसरात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही अभिमानास्पद बाब आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या मातीतल्या लोकांसाठी व्हावा या भावनेतून डॉ. गौरव खर्डे यांनी सुरू केलेले हे रुग्णालय निश्चितच कौतुकास्पद आहे.
परिसरातील वैभव हे येथील शिक्षण व्यवस्थेमुळे आणि प्रवरेच्या अखंड ज्ञानगंगेमुळे निर्माण झाले असल्याचे सांगत त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी पाहिलेले शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या बळावर समाजात नाव कमवावे हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समाजातील हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी गावाच्या विकासासाठी व पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी वेळ द्यावा, असे आवाहन करत त्यांनी डॉ. गौरव खर्डे व डॉ. रेणुका खर्डे यांना भावी रुग्णसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. गौरव खर्डे यांनी प्रास्ताविक करत माझ्या आई-वडिलांचे मी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगत आपल्याच गावात हॉस्पिटल सुरू करण्याचे स्वतः चे स्वप्न पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे हे आवर्जून नामदार विखे साहेबांना धन्यवाद दिले.
यावेळी राहाता तालुक्याचे आरोग्य अधिकारी संजय घोलप, प्रवरा बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोकशेठ असावा, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्कर खर्डे, माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पा., पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, राजेंद्र सोमवंशी आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवट पद्मश्री विखे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे पा.यांनी आभार प्रदर्शन केले .
याप्रसंगी भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, साहेबराव दळे, कृषिभूषण राजेंद्र कुंकूलोळ, भगवंतराव खर्डे, डॉ. राहुल कुंकूलोळ, मधुकर खर्डे, पांडुरंग खर्डे, शरद खर्डे, प्रतीक खर्डे, डॉ. प्रशांत खर्डे, डॉ. मृणाल खर्डे, डॉ. पल्लवी खर्डे, भरत खर्डे, राहुल खर्डे,ऋषिकेश खांदे, विजय निबे, संभाजी देवकर,रवींद्र धनवटे, श्रीकांत खर्डे, धनंजय दळे, स्वप्निल निबे, डॉ. श्रीकांत बेद्रे,सुधीर खर्डे,पंढरीनाथ खर्डे, पत्रकार गणेश सोमवंशी, सुनीता शेळके, स्वाती खर्डे तसेच खर्डे परिवारातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



