मेष –
कुटुंबीयांशी आणि जवळच्या व्यक्तींशी प्रेमाने आणि मोठेपणाने वागा. नाते अधिक मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील.
वृषभ –
मित्र-नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील.प्रेमसंबंध आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. व्यवसाय व नोकरीत चांगल्या संधी मिळतील. प्रवासाची शक्यता असून आळस टाळा.
मिथुन –
व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये चांगली प्रगती होईल. बचत करण्यावर भर द्या. घरात शुभकार्य किंवा पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. कुटुंबाचा विश्वास जिंकाल.
कर्क –
करिअर आणि व्यवसायात आकर्षक संधी मिळतील. नवीन कल्पनांना यश मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढेल.
सिंह –
बोलताना आणि वागताना नम्रता ठेवा. वाद-विवादापासून दूर राहा. कामात संयम ठेवा आणि घाईत निर्णय घेऊ नका. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.
कन्या –
व्यवसायात आर्थिक लाभ आणि प्रगतीची संधी मिळेल. नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. कामात उत्साह ठेवा, पण उधार व्यवहार करताना सावध रहा.
तुळ –
नोकरी आणि व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मान-सन्मान वाढेल. नवीन संधी मिळाल्याने पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक –
नशीबाची साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायातील योजना यशस्वी होतील. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
धनु –
घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. वाद टाळा आणि नियमांचे पालन करा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका.
मकर –
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सर्वांशी सहकार्याने वागाल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. निर्णय विचारपूर्वक घेतल्यास यश मिळेल.
कुंभ –
कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयम ठेवा. जोखीम घेणे टाळा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या आणि निष्काळजीपणा करू नका.
मीन –
मित्रांसोबत आनंददायी प्रवासाचा योग आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि मन प्रसन्न राहील.



