spot_img
spot_img

नेवाशात झाडांच्या फांद्यांनाच इंटरनेट केबलचा फास!

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा शहरातील सार्वजनिक वृक्षांच्या संरक्षणाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाचे धडे नागरिकांना दिले जात असताना दुसरीकडे नगरपंचायतीच्या हद्दीतीलच वृक्षांच्या फांद्यांचा वापर इंटरनेट केबलसाठी आधार म्हणून केला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीच्या काळात शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लावण्यात आलेली झाडे आज खासगी सुविधांसाठी वापरली जात असल्याचे दिसत आहे. शहरातील बसस्थानक परिसरासह काही भागांमध्ये वृक्षांच्या फांद्यांना इंटरनेटच्या केबल बांधण्यात आल्या आहेत. झाडे ही शहराची सामूहिक संपत्ती असताना त्यांचा अशा प्रकारे आधार म्हणून वापर होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

पुढील बातमी सविस्तर दैनिक जनतामध्ये उद्या पहा 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!