मेष:
रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. वरिष्ठांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
वृषभ:
कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. जुने येणे वसूल होण्याची शक्यता असून नातेसंबंध अधिक दृढ होतील.
मिथुन:
सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस उत्साहवर्धक आहे.
कर्क:
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता आहे. नवीन योजना राबवण्यासाठी योग्य वेळ ठरू शकतो.
सिंह:
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. वाहन खरेदी किंवा मोठा निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या:
मालमत्तेशी संबंधित कामे पुढे सरकतील. घरगुती खरेदीचे नियोजन होईल. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
तुळ:
प्रवासाचे योग आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. आरोग्य आणि वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी.
वृश्चिक:
व्यावसायिकांसाठी लाभदायक दिवस आहे. थकित पैसे मिळण्याची शक्यता असून अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यात उपयोगी ठरेल.
धनु:
करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात बदल सकारात्मक ठरतील. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
मकर:
नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. कुटुंबाच्या सहकार्याने नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
कुंभ:
सामाजिक संपर्क वाढतील. नोकरीच्या मुलाखती किंवा करिअरशी संबंधित प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही बदल करावे लागू शकतात.
मीन:
नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी कुटुंबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत असून मित्रांच्या सहकार्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात.



