spot_img
spot_img

जन्माष्टमीला तयार होणार शुभ योग! अखेर ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन सुरू; नशिबी प्रचंड पैसा, सुख-समृद्धी अन् धनसंपत्ती

गुरु आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत असतील, तर बुध मित्र राशी सिंहमध्ये असेल. तसेच शुक्र स्वतःच्या राशीत म्हणजेच तूळ राशीत असेल. चारही शुभ ग्रह अनुकूल स्थितीत असल्यामुळे काही राशींना चांगले परिणाम मिळू शकतात. चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन राशी :-

ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीच्या दिवशी चारही शुभ ग्रह अनुकूल स्थितीत असतील. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम तुम्हालाही मिळू शकतो. कुठे पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनाही कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव मिळू शकतात. काही लोकांना बढती मिळण्याचेही योग आहेत. बुधाच्या स्थितीमुळे तुमच्या आत्मविश्वासातही वाढ होऊ शकते.

कर्क राशी :-

कर्क राशीच्या लोकांसाठीही जन्माष्टमीचा दिवस शुभ ठरू शकतो. या दिवशी तुमच्या राशीचा स्वामी चंद्र उच्च राशी वृषभमध्ये असेल. तसेच गुरु ग्रह तुमच्या राशीतच उच्च स्थितीत असेल. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी मिळू शकते. घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवता येईल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढू शकते, त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल.

तूळ राशी :-

जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुमच्या राशीतच म्हणजेच तूळ राशीत असेल. तसेच गुरु तुमच्या कर्म भावात उच्च स्थितीत असेल. ग्रहांची ही स्थिती तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासात वाढ करू शकते. त्याचा चांगला परिणाम तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळू शकतो. तुमच्या कामाच्या वेगामुळे वरिष्ठ अधिकारीही खूश होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांना नफा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातही चांगले परिणाम मिळू शकतात.

मीन राशी :

मीन राशीच्या लोकांसाठीही जन्माष्टमीचा दिवस आनंददायी ठरू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी गुरु उच्च स्थितीत असणे आणि चंद्र तिसऱ्या भावात असणे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. काही लोकांना चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवनात पुन्हा समतोल निर्माण होऊ शकतो आणि जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवता येईल. या राशीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!