spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नावर श्रेयासाठी नौटंकी आंदोलन नको – कानवडे  तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आ. अमोल खताळ यांच्या महावितरणला सूचना

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- महावितरणकडून शेतीसाठीच्या थ्री-फेज वीजपुरवठ्याच्या वेळेत वारंवार बदल होत असल्याने धांदरफळ गटा तील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठीचा थ्री-फेज वीजपुरवठा रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देणे अनेक शेतकऱ्यांना गैर सोयीचे असल्याने वीजपुरवठ्याची वेळ शेतकऱ्यांच्या सोयीची असावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, सध्याचा वीजपुरवठ्याच्या वेळेतील बदल हा महावितरण समोरील तांत्रिक अडचणी आणि अतिरिक्त वीजदाबामुळे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून कार्यवाही सुरू असताना, केवळ या प्रश्नाचे श्रेय घेण्यासाठी आंदोलन उभे करणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे राजकीयी करण करण्याऐवजी तो कायम स्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी भूमिका शिवसेनेचे आशिष कानवडे यांनी मांडली.

धांदरफळ गटातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या वीज समस्यांची माहिती आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी तसेच अतिरिक्त वीजदाबाबाबत माहिती घेऊन गणेशोत्सवाच्या काळात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा अनावश्यकपणे खंडित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच अतिरिक्त वीजदाबाची समस्या लक्षात घेऊन पुढील चार-पाच दिवसांत थ्री-फेज वीजपुरवठ्याच्या वेळेत शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य तो बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे कानवडे यांनी सांगितले.

धांदरफळ गटात शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, या भागात मोठ्या संख्येने ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर शेतकऱ्यांना दीर्घकाळ वीजवंचित राहावे लागू नये, यासाठी काही दिवसांत विनामूल्य नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज धांदरफळ येथे शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासाठी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, केवळ राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी किंवा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आंदोलन करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा वापर राजकारणासाठी करण्यासारखे आहे, अशी टीकाही कानवडे यांनी केली.

‘२०२१ मध्ये आवाज उठविणारे कुठे होते?’

सन २०२१ मध्ये ऐन पेरणीच्या काळात वीजबिल थकीत असल्याच्या कारणावरून अनेक शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविणारे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य कुठे होते? त्यावेळी आपल्या राजकीय नेतृत्वाच्या विरोधात आंदोलन करण्याचे धाडस का झाले नाही? असा सवालही आशिष कानवडे यांनी उपस्थित केला.

आज तालुक्यात सत्तांतर झाल्यानंतर सामान्य शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत आहे. ज्या प्रश्नावर प्रशासन आणि महावितरणच्या पातळीवर तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यावर श्रेय घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा प्रशासनाशी समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसा आणि त्यांच्या सोयीच्या वेळेत सुरळीत थ्री-फेज वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. वीज, ट्रान्सफॉर्मर, शेती, पाणी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-महायुतीचे कार्यकर्ते गावागावात कार्यरत आहेत.

“शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण नको; कायमस्वरूपी समाधान हवे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आमदार अमोल खताळ पाटील आणि महायुतीचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत,” असे मत शिवसेनेचे आशिष कानवडे यांनी व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!