spot_img
spot_img

उक्कलगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ॲड. पुरुषोत्तम थोरात, व्हाईस चेअरमनपदी बेबीताई थोरात बिनविरोध निवड !

उक्कलगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या उक्कलगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ॲड . पुरुषोत्तम पंढरीनाथ थोरात, तर, व्हाईस चेअरमनपदी बेबीताई ज्ञानदेव थोरात यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहेत. या निवड प्रक्रियेमुळे सहकार वर्तुळात आणि स्थानिक राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहेत.

​मंगळवारी सकाळी सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळ व सभासदांची महत्त्वाची बैठक पार पडली. श्रीरामपूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाचे रविंद्र जाधव यांनी या निवडणूक सभेचे पीठाीसीन अधिकारी म्हणून काम पाहिले.त्यास संस्थेचे सचिव शिवाजी थोरात यांनी सहकार्य केले.

यावेळी, पंचायत समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत शांत आणि पारदर्शकपणे वातावरणात पार पडली.

उक्कलगाव सोसायटीच्या याच निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याबरोबर गावाचे विशेष लक्ष लागले होते. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनल्यामुळे स्थानिक राजकीय घडामोडींना तीव्र वेग आला होता.सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात पडणार,

याबाबत सहकार वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. काही इच्छुकांनी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.मात्र, अखेरीस सर्वानुमते बिनविरोध निवड करत ‘एकोप्याचे दर्शन’ घडविण्यात आले.या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवडीवरून या संस्थेवरील त्यांचे मजबूत वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत.संस्थेवरील आपली पकड कायम राखत त्यांनी घेतलेला निर्णय सर्वांच्या मान्यतेने अंमलात आला आहेत.

​निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित चेअरमन ॲड. पुरुषोत्तम थोरात आणि व्हाईस चेअरमन बेबीताई थोरात यांचे ग्रामस्थ, सहकारी आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी, देवस्थानचे सचिव शरद दत्तात्रय थोरात, ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात, विश्वस्त अनिल थोरात, मधुकर शिंदे, ज्ञानदेव थोरात, आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी, जेष्ठ मार्गदर्शक बन्सीभाऊ थोरात, देवस्थानचे अध्यक्ष उल्हास महाराज तांबे, शिवाजी सोपान थोरात, सुरेश मुसमाडे, ॲड.विलास थोरात, माजी प्रा.एकनाथ ढोणे, तुकाराम चिंधे, श्रीकांत जगधने, बंडेराव तांबे, विकास पा.थोरात,प्रकाश जगधने, विश्वस्त भाऊसाहेब पगारे, मच्छिंद्र धनवटे,दत्तात्रय कर्डिले,पंढरीनाथ थोरात,एकनाथ थोरात,ज्ञानदेव थोरात,अनिल भानुदास थोरात,बापुसाहेब चिंधे, वैशाली थोरात, सुनिता थोरात, रामभाऊ रंधे,बाळासाहेब थोरात, संदिप थोरात,किशोर थोरात,सुधाकर थोरात, ग्रामपंचायत सदस्य बबन रजपूत,सुनिल पारखे,रविंद्र विश्वनाथ थोरात,आंनदा थोरात, दिगंबर मोरे यांच्यासह सहसचिव सुरेद्र थोरात,ज्ञानेश्वर थोरात, सुरेश फुलपगार, केरु तोरणे, बाबासाहेब थोरात, केरू तोरणे,विलास शिंदे, प्रकाश गाडेकर, भारत थोरात, प्रदिप थोरात, आदीसह संचालक मंडळ, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ही’ चेअरमनपदाची निवड शेवटची ‘टर्म’!

​सध्या सोसायटीच्या निवडणुकीला साडेआठ महिन्यांचा कालावधी बाकी असून, त्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!