राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता व कोपरगाव येथील वाळु तस्कराविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई करत ३आरोपी ताब्यात, ३०,४० लाखांचा मुद्देमाल जप्त केले आहे.
१७ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर रोजी रोजी पथकाने राहाता व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढुन २ ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे २ गुन्हे दाखल करून एकुण ३०,४०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पो.नि. संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार सुनिल पवार, अरुण गांगुर्डे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव, अजिनाथ पाखरे, सतीष भवर अशांचे पथक तयार करून अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
राहाता पोलीस ठाणे हद्दीतील कारवाई
राहाता गु.र.नं. ३८५/२०२६ (BNS) कलम ३०३(२), ३(५) १५,२०,०००/-
1) विशाल संजय जोगदंड, वय 35, रा.पुणतांबा बाजारतळ, शिर्डी
2) रामनाथ हरीभाऊ शिंदे, वय 30, रा.लुटे वस्ती, पिंपळवाडी रोड, शिर्डी
3) स्वप्नील गोंदकर, पुर्ण नाव माहित नाही, रा.शिर्डी (फरार)
कोपरगाव हद्दीतील कारवाई
कोपरगाव तालुका गु.र.नं. ४२४/२०२६ भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम ३०३(२) १५,२०,०००,/-
1) आकाश दशरथ पगारे, वय 23, रा.कोपरगाव खडकी, ता.कोपरगाव
2) विशाल लोंढे, पुर्ण नाव माहित नाही, रा.सिन्नर, जि.नाशिक (फरार)
वरील कारवाई .मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.




Total Users : 643235