spot_img
spot_img

‘सख्या भाऊ झाला पक्का वैरी’ उक्कलगाव प्रकरणात शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई,आरोपी गजाआड

उक्कलगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- दारूच्या व्यसनाला कंटाळून आणि लग्नात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून लहान भावानेच ‘आपल्या मोठ्या भावाचा’ खून केल्याची खळबळजनक घटना श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे घडली आहेत.श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी लहान भावाला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. आशिष उर्फ लाल्या विजय पारखे (वय २७, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मृत मोठ्या भावाचे नाव असून, आरोपी अनिकेत विजय पारखे (वय २६) असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. काल दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी मयत आशिष हा त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या डाव्या कानाखाली मानेवर गंभीर जखम असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वैद्यकीय अहवालात टणक हत्याराने मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा घातपात व खून असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी मृताच्या पत्नीसह नातेवाईकांची कसून चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहेत.​मयत आशिष याला दारूचे तीव्र व्यसन होते. तो दारू पिऊन घरात सतत आरडाओरडा करत असे, ​आशिषच्या या त्रासामुळे त्याची पत्नी गेल्या चार महिन्यांपासून वडिलांकडे राहत होती. मोठा भाऊ आशिषच्या दारू पिण्याच्या व आरडा -ओरड्याच्या सवयीमुळे आपले लग्न जमत नसल्याची भावना लहान भाऊ अनिकेतच्या मनात निर्माण झाली होती. याच वैमनस्यातून त्याने मोठ्या भावाला संपवल्याचे तपासात पुढे आले आहेत.पोलिसांनी तात्काळ अक्षय पारखे व अनिकेत पारखे दोघा भावाना ताब्यात घेतले होते.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे, स.पो.नि. चेतन लोखंडे व पथकाने तातडीने तपास चक्रे फिरवली.

याप्रकरणी ​मृत आशिष यांची पत्नी साक्षी पारखे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी लहान भाऊ अनिकेत पारखे यास तात्काळ अटक केली असून, पुढील तपास सुरू आहेत. श्रीरामपूर पोलिसांच्या या जलद व धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सदरची कारवाई पोनि विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली

स.पो.नि.चेतन लोखंडे, स.पो.नि राम शिखरे, पो.हे.कॉ. गणेश भिंगारदे, मनोज गोसावी, बाळासाहेब कोळपे, पो.कॉ.संपत बडे, रामेश्वर तारडे,,.ज्ञानेश्वर वाघमोडे, .भारत तमनर, .नंदु लोखंडे, .आकाश वाघमारे,.नितीन शिंदे यांनी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!