spot_img
spot_img

चंद्रशेखर चौक मंडळाचा खाटूश्याम देखावा आ. खताळ यांच्या उपस्थित गणेश भक्तांसाठी खुला

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-  संगमनेर शहरातील मनाच्या समजल्या जाणाऱ्या चंद्रशेखर हिंदू मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त यावर्षी राजस्थान मधीला खाटू श्याम या देवस्थानाचा देखावा साकारण्यात आलेला आहे आकर्षक देखाव्याचे उद्घाटन आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

या उद्घाटन सोहळ्यास मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, विजय नागरी पतसंस्थेचे चेअरमन पराग सराफ, भाजप शहर आध्यक्षा पायल ताजणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख यांच्यासह शिरीष मुळे, विनय गुणे, कमलाकर भालेकर, गिरीशजी देशपांडे, विशाल जाखडी, श्याम भडांगे, प्रसाद पवार, सागर दीक्षित, ऋषिकेश मुळे हे मान्यवर उपस्थिती होते .

चंद्रशेखर चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी प्रथमच राजस्थान मधील खाटू श्याम या देवस्थानच्या दर्शनाचा देखावा गणेश भक्तांसाठी तयार केला आहे हा देखावा पाहण्यासाठी शहर आणि परिसरातील गणेशभक्तांची गर्दी होत आहे.गणेशोत्सव काळात नागरिकांनी मोठ्या संख्येने मंडळाच्या देखाव्याला भेट द्यावी असे आवाहन चंद्रशेखर हिंदू हिंदू तरुण मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव ठरावा, यासाठी मंडळांनी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!