spot_img
spot_img

ब्रह्मलीन श्री समर्थ सद्गुरू बालसंन्यासी हरिबाबा यांचा ३७ वा पुण्यतिथी सोहळा महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

वडाळा महादेव ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील योगी महंत माणिकनाथजी महाराज मठाधिपती बालसंन्यासी हरिबाबा आश्रमात ब्रह्मलीन श्री समर्थ सद्गुरू बालसंन्यासी ह.भ.प. हरिबाबा यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या या सोहळ्याची सांगता शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम भजन, कीर्तन तसेच श्रीशिवलीलामृत ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता ग्रंथ पारायणास प्रारंभ होईल. दररोज सकाळी व दुपारी भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी गोदाधाम, श्रीक्षेत्र सराला बेट येथील महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी ११ ते १ या वेळेत होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन योगी महंत माणिकनाथजी महाराज तसेच बालसंन्यासी हरिबाबा आश्रमाच्या व समस्त ग्रामस्थ तसेच भक्त मंडळ शिरसगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!