spot_img
spot_img

राहुरीत नाथ प्रतिष्ठानचा भव्य ‘रास दांडिया’ अन् ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन

राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा):- नवरात्रोत्सवानिमित्त नाथ प्रतिष्ठान, राहुरी यांच्या वतीने महिलांसाठी यंदा मनोरंजनाची खास मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर रास दांडिया आणि ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान भव्य रास दांडिया महोत्सव, तर १९ ऑक्टोबर रोजी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम रंगणार आहे. झी मराठी फेम सिनेअभिनेते ओम यादव हे सूत्रसंचालन करणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत येणार आहे.

विद्यामंदिर प्रशालेत रंगणार रास दांडियाचा जल्लोष

राहुरीतील विद्यामंदिर प्रशाला येथे १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत रास दांडिया महोत्सव रंगणार आहे. महिलांसाठी या कार्यक्रमाला मोफत प्रवेश देण्यात आला असून, नवरात्रोत्सवाचा आनंद उत्साहात साजरा करण्याची संधी राहुरीकर महिलांना मिळणार आहे.

‘होम मिनिस्टर’मध्ये बक्षिसांचा वर्षाव!

१९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात झी मराठी फेम ओम यादव यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक स्कूटी, द्वितीय क्रमांकासाठी एलईडी स्मार्ट टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी इलेक्ट्रिक शेगडी, तर चौथ्या क्रमांकासाठी मिक्सर असे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच दररोजच्या रास दांडिया कार्यक्रमातही अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

रिल्स स्पर्धेतही रोख बक्षिसे

दांडिया महोत्सवाच्या निमित्ताने रिल्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाला ७ हजार ७७७ रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये अशी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : सौरभ उंडे

नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सौरभ उंडे म्हणाले, “नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांना आनंदाचे आणि मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राहुरीतील महिलांनी मोठ्या संख्येने रास दांडिया तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाला उपस्थित राहून या उपक्रमाचा मनमुराद आनंद घ्यावा.”

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!