अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगरमध्ये दि २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मार्केटयार्डसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक पठन करण्यात आले. या उपक्रमातून संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
बोलताना आमदार जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारतात समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा भक्कम पाया निर्माण झाला. संविधान हे कोणत्याही एका समाजाचे नसून संपूर्ण भारतीयांचे आहे. संविधानिक मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
याप्रसंगी नगरसेवक सुरेश बनसोडे यांनीही संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.




Total Users : 687637