spot_img
spot_img

श्रीरामपूर येथे रास्तारोको आणि पोलीस ठाण्यात जमाव जमवून गोंधळ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा 

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथे एका जमावाने रास्ता रोको केल्यानंतर पोलीस ठाण्यात जमाव जमवून आरडाओरडा आणि गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी काही जणांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास डायल ११२ वर एक कॉल प्राप्त झाला होता. दत्तनगर येथील आंबेडकर वसाहत परिसरात एका व्यक्तीला गोळी लागून तो जखमी झाल्याची माहिती या कॉलद्वारे देण्यात आली होती, तसेच रुग्णवाहिका आणि पोलीस मदतीची मागणी करण्यात आली होती.

​या माहितीच्या आधारे डायल ११२ पथकातील पोलीस कर्मचारी दत्तात्रय लहानु सातकर आणि होमगार्ड देवकर हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. तेथे पोहोचल्यानंतर दत्तनगर पाटावर विकास जगधने, जय सोमनाथ भांड, विश्वास चांदणे यांच्यासह अन्य पाच ते सहा अनोळखी पुरुष आणि तीन ते चार महिला जमा झाल्याचे दिसून आले. या जमावाने आरडाओरडा करत श्रीरामपूरहून बाभळेश्वरकडे जाणारा डांबरी रस्ता अडवून खाली बसण्याचा प्रयत्न केला.

​घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्यासह इतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जमावाची समजूत काढली. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी जमावाकडून करण्यात येत होती. हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आणि तक्रार असल्यास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन केले. त्यानंतर जमाव तेथून पांगला.

​मात्र, त्यानंतर हा जमाव थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तेथे मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागला. विकास जगधने, जय सोमनाथ भांड, विश्वास चांदणे यांच्यासह काही अनोळखी पुरुष व महिलांनी बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

​या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय सातकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!