श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मराठी पत्रकार संघ श्रीरामपूरच्यावतीने उद्या रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार सोहळा व पदाधिकारी पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व श्रीक्षेत्र सरला बेट चे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सत्यजित तांबे,संपादक अनंत पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती अध्यक्ष करण नवले व कार्याध्यक्ष ॲड, बाळासाहेब आगे यांनी दिली.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी पत्रकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार श्री.रमण मुथा,श्री.रमेश कोठारी व श्री.पद्माकर शिंपी यांचा जीवनगौरव पुरस्कार सन्मान सोहळा व मराठी पत्रकार संघ श्रीरामपूरच्या नूतन पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री.नवले,ॲड,आगे यांच्यासह संस्थापक अध्यक्ष प्रदीप आहेर,उपाध्यक्ष महेश रक्ताटे,मनोज आगे,सचिव सुरेश कांगुणे,खजिनदार राहुल मुथा,संघटक भाऊसाहेब काळे, मार्गदर्शक नागेश सावंत, कार्यकारीणी सदस्य सुनील कुलकर्णी,सलीमखान पठाण,जयेश सावंत,सचिन उघडे व मराठी पत्रकार संघ, श्रीरामपूर सदस्यांनी केले आहे.




Total Users : 689963