वैजापूर (जनता आवाज वृत्तसेवा):- वैजापूर येथील दि. वैजापूर मर्चंट्स को- ऑप बँकेच्या सोळा संचालकांची बिनविरोध निवड झाली. बॅकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली.
बॅकेच्या वैजापूर सह संभाजीनगर, जालना, नाशिक व गंगापूर येथे शाखा आहेत.राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी दि.वैजापूर मर्चंट्स को-ऑप. बँक लि संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया सुरु केली .
निवडणुक कार्यक्रमानुसार दि.०१ऑगस्ट पर्यंत २१ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांची छाननी दि. ०२ ऑगस्ट रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केली.यात पाच नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे १६ संचालकची बिनविरोध निवड झाली .
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे :-
रविंद्र बन्सीलाल संचेती ,विजय विश्राम ठोंबरे ,विशाल जीवनलाल संचेती,विजय वल्लभदास वेद,सौरभ रविंद्र संचेती ,मनोज मोहनलाल छाजेड , महेंद्रकुमार कांतीलाल गुंदेचा , प्रतिम प्रेमचंद मुथा , विनय चांदमल सुराणा, प्रकाश पुनमचंद पिरथानी ( अग्रवाल) ,विजयकुमार जगदीश दायमा,विनोद काशिनाथ गायकवाड , सावनसिंह कल्याणसिंह राजपूत,प्रशांत उत्तमराव त्रिभुवन ,वैशाली प्रशांत साखरे, शालिनी नितीन सोमाणी
पाच जणाचे नामनिर्देशनपत्रे झाले अपात्र….
दि. वैजापूर मर्चंट्स काॅपरेटिव्ह बॅकेचे संचालक मंडळ निवडणूकीत उपविधी ४० मधील तरतुदीनुसार शेअर्स रक्कम व अनामत रक्कम नियमानुसार नसल्यामुळे १) राजेंद्र सिताराम व्यवहारे , २) काशिनाथ भागाजी गायकवाड ( ओबीसी) , ३) सरला राजेंद्रकुमार संचेती ( महिला राखीव) , ४) भागीनाथ शहादू मगर, ५) दिगंबर आसाराम खंडागळे ( सर्वसाधारण मतदार संघ) यांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी अपात्र ठरवले.