spot_img
spot_img

प्रवरा कन्या विद्या मंदिरचा फुटबॉल संघ राज्यात करणार पुणे विभागाचे नेतृत्व

लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा   ):-विभागीय स्तरावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी येथील विद्यार्थीनींच्या संघाने दमदार कामगिरी करीत सोलापूर येथे झालेल्या विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये सेमी फायनल सामन्यात प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी (अहमदनगर ग्रामीण) विरुद्ध सोलापूर ग्रामीण यांच्यात झाली. यात प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या खेळाडूंनी ४-० ने सोलापूर ग्रामीणचा पराभव करून संघ फायनल स्पर्धेसाठी पात्र ठरला.

फायनल स्पर्धा प्रवरा कन्या विद्या मंदिर विरुद्ध पुणे शहर यांच्यात झाली. या अंतिम सामन्यात प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या संघाने पुणे शहर संघाचा ५-० ने दणदणीत पराभव करत विजय प्राप्त केला.आता हा संघ राज्य पातळीवर पोहचला आहे. विजयी संघाला विद्यालयाच्या क्रिडा संचालिका सौ विद्या घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हॉकी कोच कल्पना कडू यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ आण्णासाहेब म्हस्के पाटील,

जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ एल. बी. सरोदे , समन्वयक प्रा. नंदकुमार दळे , क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे, प्राचार्या सौ भारती कुमकर ,सौ सीमा बढे , पर्यवेक्षक बी पी चिंधे , जुनिअर कॉलेजचे इनचार्ज प्रा. नंदू कुदळे, सुचित्रा तांबे,अनिल लोखंडे ,मोहिनी गायके ,सुरेश गोडगे व सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यीनी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!