spot_img
spot_img

विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनीच्या स्थापना दिनी श्रीरामपुरात विविध कार्यक्रम संपन्न 

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी, मातृशक्ती, श्रीरामपूर प्रखंड, श्रीरामपूर जिल्हा आयोजित “सन्मान स्री शक्तीचा” हा कार्यक्रम रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते सायं. ५ या वेळेत ठिकाण: यशवंतराव चव्‍हाण सभागृह, श्रीरामपूर नगरपालिका येथे संपन्न झाला.

नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला दुर्गावाहिनीची स्थापना झाली होती, त्या निमित्ताने शस्‍त्रपुजन व शास्‍त्रपुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

नवरात्रोत्‍सव या विषयांवर वर २ मिनीटांत माहिती हि स्पर्धा घेण्यात आली व त्याचे बक्षीस वितरण झाले.संबळ वाजवून मंगळा गौरीचे खेळ, पारंपारिक खेळ, भोंडल्‍याचा पारंपारिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवदुर्गा, देवी वेषभुषा करून आल्या होत्या.

यावेळी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ब्रम्हाकुमारी अनिता दिदी, श्रीमती वर्षा आगाशे, रिमा गोसावी, आरती शिंदे, मनिषा आगाशे, वैशाली कुलकर्णी, भाग्यश्री बडे, सुजाता मालपाठक, कल्पना वाघूनडे यांना “गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार “सन्मान चिन्ह” व भगवी शाल देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निशाताई निर्मळ, मातृशक्ती जिल्हा संयोजिका पार्वती नानेकर, दुर्गावाहिनी जिल्हा संयोजिका स्वप्ना थेटे, मातृशक्ती संयोजिका विद्या वाघ, दुर्गावाहिनी प्रखंड संयोजीका धनश्री लोळगे, सहसंयोजीका ऋतुजा पालकर, नेहा देवरे, नेहा कांबळे, ॲड. पल्लवी कांबळे, शामल बेल्हेकर, संगमनेर दुर्गावाहिनी संयोजिका ॲड. सोनाली बोटवे, हिना उबाळे, बाल संस्कार वर्ग लोणी, प्रमुख अनिता गोरे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्गावाहिनी जिल्हा संयोजिका स्वप्ना थेटे व श्रेया कुलकर्णी व विश्व हिंदू परिषदेचे विश्वनाथ नानेकर आदींनी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!