spot_img
spot_img

श्री.वज्रेश्वरी मातेची ज्योतचे राहाता शहरात पिपाडा दाम्पत्याच्या वतीने स्वागत…..

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-सालाबादप्रमामे श्री.वज्रेश्वरी प्रतिष्ठान च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त कलकत्ता येथुन एकरुखे च्या श्री.वज्रेश्वरी मातेची ज्योत नेली जाते. या ज्योतचे स्वागत लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी केले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र भवर,गणेश थोरात तसेच मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

मोठ्या उत्साहात राहाता शहरात या ज्योतचे स्वागत केले जाते. प्रचंड भावीक दर्शनासाठी उभे असतात. काही ठिकाणी रस्त्यांवर रांगोळ्यांचा सडा टाकलेला असतो तर काही ठिकाणी फटाक्यांच्या आतिशबाजी केली जाते. मोठ्या मनोभावे महिलांकडुन या ज्योतीची पुष्पमाळ घालुन पुजा केली जाते. पिपाडा दाम्पत्य सालाबाद प्रमाणे या ज्योतचे स्वागत करतात. राहाता शहरातुन ही ज्योत एकरुखे येथे नेली जाते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!