लोणी दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय लोणी येथील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिदुतांच्या माध्यमातून डाळिंब पिकांवरील रोग आणि कीड नियंत्रण याविषयी चर्चासत्राचे निंभेरे येथे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रास शुभम कडलग,समन्वयक अधिकारी डॉ. रमेश जाधव सर यांनी डाळिंब पिकावरील रोग व कीड नियंत्रण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कीड व रोग नियंत्रणाची गरज, त्या वरील उपाय व फायदे या विषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी शेतकरी ज्ञानदेव साबळे, रामचंद्र हारदे, जिजाबापू सिनारे, शांताराम सिनारे, बबनराव सिनारे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .
सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, डाॅ. रमेश जाधव , डॉ. दीपाली तांबे , डाॅ. विक्रम अनाप यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत गणेश पिसाळ, प्रदिप गावडे, ज्ञानेश्वर थोरात, अभिषेक पाटील, विश्वजीत पवार, वैभव चव्हाण आणि तेजस खेमनर यांनी प्रयत्न केले.




Total Users : 632353