लोणी दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे यांनी दिली.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे (सि.ई.टी) परिक्षा द्वारे सुबोध कडू (कृषी कीटकशास्र) डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्याल बारामती, तेजल वदक (कृषी अर्थशास्त्र) कृषी महाविद्यालय लातूर, ऋतुजा जाधव (कृषी कीटकशास्र) कृषी महाविद्यालय धुळे, अनिकेत देशमुख व तेजस सहाने (एम.बी.ए) कृषी महाविद्यालय (एम.बी.ए. अँग्री) पुणे, महेश जाधव (एम.बी.ए) कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लातूर आणि अमित दराडे (कृषी अर्थशास्त्र) कृषी महाविद्यालय पुणे यांची तसेच गौरव काळे (कृषीशास्त्र) याची लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब येथे पदव्युत्तर पदवीसाठी निवड झालेली आहे.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी कृषी महाविद्यालय , लोणी विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवार फेरी , मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने , कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी , कार्यानुभव उपक्रम , शेतकरी मेळावे इ. उपक्रमाचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



